Tuesday, November 9, 2010
kelyache aappe
पिकलेली केली-२
गूळ-चवीप्रमाणे
ओले खोबरे
रवा
काजूचे तुकडे
वेलची पावडर
कृती-
१. प्रथम केली कुस्करून घ्यावीत.
२. त्यात आवदीप्रमाने गूळ घालावा
३.थोडेसे ओले खोबरे घालून घ्यावे
४.त्यात मावेल तेवढा रवा घालावा.
५. मिश्रनाची consistancy वांग्याच्या भरीताप्रमाने झाली पाहिजे.
६. काजूचे तुकडे आणि वेलची पावडर घालून नीट मिक्स करावे.चिमूटभर मीठ घालावे.
७. मिश्रणाचे गोले तेलात तलून काढावे किंवा आप्पेपात्रात तलावेत
Keshar jilebi
बारीक रवा -1 वाटी
मैदा -१ /२ वाटी
बेसन -1 चमचा
गरम पाणी -अंदाजाने
दही/ताक - १ चमचा
साखर-३ वाट्या
केशरी रंग
लिंबू रस
तलन्यासाठी तूप
कृती
रवा,मैदा आणि बेसन नीट एकत्र करून त्यात थोड़े कोम्बट पाणी आधी घालून मग त्यात दही /ताक घालून नीट मिक्स करावे.consistancy ईदलीच्या पीठाप्रमाने पाहिजे. (जर मिश्रण प्रमाणापेक्षा पातळ झाले तर त्यात थोडा मैदा आणि जर घट्ट झाले तर थोड़े गरम पाणी घालून ते सारखे करावे.)
हे मिश्रण झाकून ८-१० तास ठेवावे.(सकाळी जिलेबी करायची तर रात्री भिजवावे.)
जिलेबी करावयाच्या आधी मिश्रणात १ चमचा तेल आणि रंग घालावा. जिलेबिचे मिश्रण sauce bottle मधे भरावे. कढईमध्ये तूप गरम करावयास ठेवावे. आणि साखरेमध्ये पाणी घालून दोन तारी पाक करायला ठेवावा. तूप तापल्यावर जिलेबी तुपातच पाडावी. एक बाजू झाल्यावर उलटाताना लोकारिची सुई किंवा skewer वापरावे. पाक झाल्यावर त्यात केशर घालून आवडत असल्यास लिम्बूरस घालावा आणि जिलेबी पाकात घालावी आणि बुडवून लगेच काढून platemadhe काढावी . वरून केशर व् बदामाचे काप घालावेत.
Friday, March 26, 2010
chocolate brownie
This dish is also eggless. Chocolate brownie goes well with hot coffee and also the perfect base for sizzling brownie (brownie with vanilla ice-cream and chocolate sauce.)
ingredients
all purpose flour(maida0-1 1/2 cup
powdered sugar- 1 cup
milk-1 cup
refined oil- 1/2 cup
cocoa powder- 1/2 cup
coffee- 1 tea sp
vinegar- 2 table sp
baking soda- 1 tea sp
vanilla essnecs- 1 tea sp
walnuts( pieces)- 1/2 cup
method
Mix all powders in a bowl (flour+sugar+cocoa+coffee+soda)
mix vinegar in lukewarm milk in a separate bowl
make a dig in the 1st bowl ( powder bowl) and add oil in it.
add milk vinegar mixture spoon by spoon in it while stirring continuously.
add vanilla essence and mix well
add walnut pieces
Transfer the contents in a greased tray and bake at 210 degrees Celsius for 40 minutes.
You can also microwave for 4-5 minutes on high power.
caramel custard
This caramel custard is made without eggs. vegetarians won't miss it.Try this recipe. it's very simple and tastes really nice.
Ingredients
milk- 1/2 lit
vanilla custard powder- 3 tea sp.( you can always use cornflour instead of readymade custard powder and can add vanilla essence in it)
sugar- 11 tea sp.
china grass- 3 table sp. ( to be dissolved in 3/4 cup water)
For caramel
sugar- 4 table sp.
water- 1 tea sp
Method
take 100 ml of milk in a small bowl and mix vanilla custard powder in it to make a smooth paste.
add sugar in the remaining milk and make it warm. add vanilla custard paste in it and stir continuously for half a minute.Put off the flame as it thickens.
Warm the dissolved china grass mixture and add it into the custard-milk mixture.
strain it and add 2-3 drops of vanilla essence.
Keep it aside.
to make caramel
heat 4 table sp. sugar with 1 tea sp. water in apan
when the colour changes and becomes brown put off the flame.
pour the caramel in a glass bowl.spread all over by rotating the bowl.
add the custard mixture slowly.
set it in a fridge for2 hours.
.
Tuesday, March 23, 2010
भरली राजेळी
राजेळी केळी चवीला खास असतात.त्यांचा एक वेगळाच स्वाद असतो.त्यामुळेच राजेळी केळयाचा हलवा किंवा भरली केळी ही चवीला वेगळी लागतात.
साहित्य
राजेळी केळी-२ ( थोड़ी पिकलेली असावीत)
खोवलेले ओले खोबरे-१ वाटी
साखर-अर्धी वाटी
ओल्या मिरच्या - १-२
आवडत असल्यास थोड़े जीरे, कोथिम्बिर, भाजलेली खसखस
तूप-२ चमचे
कृती
एक केळयाचे ३ -४ भाग करावे.प्रत्येक भागाला चार खाचा पाडाव्या .(भरल्या वांग्याला चिरतो तसे चिरावे).खोबरे,साखर,मिरची आणि थोडेसे मीठ नीट एकत्र करावे। त्यात आवडत असल्यास भाजलेली खसखस,जीरे,कोथिम्बिर घालावी.)हे सारण केळयाच्या भागात भरावे (भरली वांगी भरतो तशी)
एका पसरट भांड्यात तूप घालून त्यावर ही केळी अलगद आडवी ठेवावीत.गैस मंद ठेवावा.भांड्यावर झाकण ठेवावे आणि केळी शिजू द्यावीत. मधून झाकण काढून केळी परतावित.सर्व बाजूनी झाली की गैस बंद करावा.
सांजोरी
सांजोरी हा एक गोडाचा प्रकार आहे.यात पुरणाच्या ऐवजी सांजा किंवा शिरा घालतात.
साहित्य
बारीक़ रवा- १ वाटी
साजुक तूप-३-४ चमचे
दूध-१ वाटी
पाणी- १ वाटी
साखर-दीड वाटी
मीठ- पाव चमचा
वेलचीपुड- आवडीनुसार
केशर- पाव चमचा
कव्हर साठी
मैदा- दीड वाटी किंवा( मैदा आणि गव्हाचे पीठ प्रत्येकी पाऊण वाटी)
न तापवलेले(निरसे ) दूध-अर्धी वाटी
थोडासा lemon colour - पाव चमचा
कृती
मैद्यात (किंवा अर्धा मैदा आणि अर्धे गव्हाचे पीठ) मीठ घालून दूधाने चपातीला भिजवतो तसे पीठ भिजवून घ्यावे.भिजवताना दूधात थोडा पिवळा रंग टाकावा. पीठ भिजवून अर्धा एक तास झाकून ठेवावे.नंतर थोड़े तेल लावून चांगले मळून घ्यावे.
तुपावर रवा चांगला गुलाबीसर परतून घ्यावा.दूधपाणी उकळून घ्यावे.रवा भाजल्यावर त्यात घालावे.झाकण ठेवून एक वाफ काढावी.त्यात साखर व मीठ घालून पुन्हा एक वाफ काढावी.आवडत असल्यास वेलचीपुड घालावी.केशर थोड्या गरम दुधात घालावे.ते दूध शि॰यात घालावे आणि नीट मिक्स करावे.थोडा गरम असतानाच शिरा नीट मळून घ्यावा.
पिठाचे आणि शि॰याचे सारखे गोळे करून घ्यावे.(पिठाच्या गोळयाच्या साधारण तिप्पट शि॰याचा गोळा घ्यावा. )
तेलाचा हात घेऊन पिठाची मोदकाला करतो तशी वाटी करावी आणि त्यात शि॰याचा गोळा भरून बंद करावे.
तान्दळाच्या पिठावर सांजोरी लाटावी आणि तव्यावर खमंग भाजून घ्यावी।
साजुक तुपाबरोबर गरम गरम वाढावी.
Wednesday, March 3, 2010
Eggless date and walnut cake in english
Mixture for this cake is mixed in a mixer and can directly transferred in a baking dish. It does not require oven and can be made on gas stove.Refined oil is used in place of solid fat( a healthier option)
Ingredients
Dates-12-15 (remove seed and soak in warm milk)
milk-1 cup(make it warm to soak the dates)
refined oil- 1 cup
sugar- 1 cup
walnuts ( slightly crushed)- 1/2 cup
baking soda- 1 t sp
maida/all purpose flour-one and a half cup
Method
soak dates in warm milk
grind sugar in a mixer first
to that add oil and blend it so that the mixture thickens
add milk-dates mixture in it add baking soda and blend it
add maida in 2-3 parts and blend it again ( you should get the dropping consistency) (you can adjust that by adding little milk if required before final blending)
add crushed walnuts and transfer the contents to the greased pan
put on the gas stove and bake it on medium flame for first 15 minutes and simmer the flame put the hot tava/griddle and continue to bake for another 25-30 minutes.
or
bake it in the preheated oven at 200 degrees celcius for 45 minutes.
खजूर अक्रोड़ केक मराठी मधेMonday, March 1, 2010
पुरणाची पोळी
होळीचा सण म्हणजे पुरणपोळी आणि कटाची आमटी हे समीकरण ठरलेलेच. हल्ली घरगुती तयार केलेल्या पोळ्या सगळीकडे विकत मिळतात.पण स्वतः पुरणपोळी करायची मज्जा काही औरच आहे.पुरणपोळी जमली की एक आनंद मिळतो तो वेगळाच असतो.
कव्हर साठी साहित्य
३/४ वाटी गव्हाचे पीठ
१ मोठा चमचा चण्याचे पीठ
कृती
दोन्ही पीठे मिक्स करून पाण्याने कणिक घट्ट भिजवावी.अर्धा तास झाकून ठेवावी.नंतर एका वाटीत १ चमचा पाणी ,१ टी स्पून मीठ, १ चमचा तेल एकत्र करावे आणि त्याने कणिक तिम्बावी (मूठीने मळावी) त्याचे ८-९ गोळे करावे.
पुरणासाठी साहित्य
१ वाटी चण्याची डाळ
२ वाट्या पाणी
वेलची पूड
कृती
पुरण करण्यासाठी १ वाटी चण्याची डाळ २ वाट्या पाण्यात कुकर मध्ये शिजत लावावी. गार झाल्यावर त्यात एक वाटी गूळ( किंवा अर्धी वाटी गूळ व अर्धी वाटी साखर) घालावी. हे मिश्रण मिक्सरमधून काढावे. हल्ली सगळयांकडे microwave असतो .मिक्सर मधले मिश्रण microwave safe bowl मधे काढावे.high वर प्रथम 3मिनिटे व नंतर ढवळून परत high वर २ मिनिटे ठेवा. परत वाटले तर अजून २ मिनिटे high वर ठेवा। साधारण कडेने सुके झाले तर थांबा. गार झाल्यावर ते चांगले होते. त्यात वेलाचीपूड घालावी.त्याचे साधारण ८-९ गोले करा .
पुरण पोळी करताना हाताला तेल लावून घ्यावे. पीठाच्या गोळ्याची मोदकाप्रमाणे खोलगट वाटी करून त्यात पुरणाचा गोळा भरावा. तोंड बंद करावे. पोलपाटावर तान्दलाच्या पीठिवर हलक्या हाताने पोळी लाटावी.(पोलपाटाला एक पातळ कपड़ा घट्ट बान्धावा)मीडियम flame वर तव्यावर शेकून घ्यावी.तव्यावर घालून एक बाजू आधी शेकावी मग दुसरी बाजू शेकून घ्यावी.एकदाच परतावी.
Tuesday, February 9, 2010
गुपचुप किंवा रव्याचा केक

हा केक माझी आजी करायची.पण त्यावेळी ती कोळशाच्या शेगडीवर करायची.खाली आणि वरती झाकणावर सुद्धा ती पेटलेले निखारे ठेवायची त्यामुळे त्याची चव खूपच खमंग लागायची.हा केक oven मध्ये तसेच गैस वरही करता येतो.या केकला लागणारे पदार्थ अगदी नेहेमी घरात असणारे असल्यामुळे तो कधीही करता येतो.केकला लागणारे प्रमाण लक्षात ठेवायला खूपच सोपे आहे.
साहित्य
रवा-१ वाटी
साखर - १ वाटी
दूध-१ वाटी
घट्ट दही-१ वाटी
साजुक तूप-१ चमचा
baking powder किंवा soda bi कार्ब-१/२ चमचा
rose essence( optional)-१/२ चमचा
rose एस्सेंस च्या ऐवजी वेलची किंवा जायफल पूड़ घातली तरी चालेल.
चारोळी,बदाम,बेदाणे आवडीनुसार
कृती
एका भांड्यात प्रथम रवा,साखर,दही,दूध,तूप आणि soda असे क्रमाक्रमाने घालावे.त्यात इतर साहित्य घालावे. चांगले ढवळून ५ मिनिटे झाकून ठेवावे.नंतर हे मिश्रण केकच्या भांड्यात ओतावे.गैस वर ठेवावे. गैस मध्यम ठेवावा.वर झाकण ठेवावे.१० मिनिटानंतर गैस मंद करावा.केकच्या भांड्या खाली तापलेला तवा ठेवावा.आणि १५-२० मिनिटे केक शिजू द्यावा.नंतर मिश्रणात सुरी किंवा toothpick घालून केक झाला का ते पहावे.मग गैस बंद करावा.
Saturday, January 30, 2010
अळिवाचे लाडू

अळिवाचे लाडू करायला सोपे.पटकन होतात.फ़क्त जास्ती टिकत नाहीत.थंडीत खाल्लेले चांगले.
साहित्य
अळिव-१ वाटी
दूध-१ वाटी
पाणी/नारळाचे पाणी -२ वाट्या
ओले खोबरे-2 वाट्या
गूळ-2 वाट्या
कृती
अलिव निवडून दूध पाण्यात भिजत घालावेत.साधारण २-३ तासात चांगले भिजतात.ते मग एक जाड base असलेल्या भांड्यात घालावे.त्यात गूळ ,खोबरे घालून गैस वर ठेवावे. गूळ पातळ होइल.सतत ढवलत रहावे.मिश्रण चकचकीत दिसायला लागते. गुळाचा पाक होउन मिश्रणाचा एक गोळा झाला पाहिजे.मग गैस बंद करावा.साधारण गार झाल्यावर लाडू वळावेत.हे लाडू २-३ दिवस बाहेर रहातात पण नंतर fridge मध्ये ठेवावेत.
तिळगुळ घ्या गोड गोड बोला

मकर संक्रन्तिला तिळाचे लाडू आणि गूळपोळी हवीच.तिळाचे लाडू करण्यासाठी चिकिचा गूळ लागतो.तेसे तिळाचे लाडू करायला अगदी सोप्पे.बिघडण्याची शक्यता खूपच कमी.
साहित्य
तीळ-१/२ किलो
गूळ-१/२ किलो
शेंगदाणे-१/२ वाटी
डाळं-१/२ वाटी
सुके खोबरे-१/२ वाटी
आल्याचा रस किंवा सुंठ पावडर
कृती
तीळ चागले भाजून घ्यावेत.(तीळ खमंग भाजलेत की नाही हे ओळखण्यासाठी भाजलेले तीळ दातांखाली चावले की टचकन आवाज येतो.तीळ भाजल्यावर थोड़े फुगीर होतात आणि त्यांचा रंगही बदलतो.) जर तीळ नीट भाजले नाहीत तर लाडवांला खमंगपणा येत नाही.)
शेंगदाणे सुद्धा खमंग भाजून त्यांची साले काढून कुटून घ्यावेत.सुके खोबरे किसून घ्यावे.दाणे,डाळं आणि खोबर्याचा किस भाजलेल्या तिळात मिक्स करावा।
आले किसुन त्याचा रस काढावा.(१/२ किलो तिलाला १/४ -१/२ वाटी रस पुरतो)
सुंठ पावडर टाकायची झाल्यास १-२ चमचे घालावी
आले घातल्याने लाड़वाला चवही चांगली येते आणि आल्यामुळे पचनही चांगले होते.
एक भांड्यात गूळ घालून गरम करावा.गूळ पातळ होउन त्याला बुडबुडे यायला लागले की पाक तयार होतोय असे समजावे.सतत ढवळत रहावे.आल्याचा रस/सुंठ घालावा व पुन्हा ढवळावे. गैस मध्यम ठेवावा.एक वाटीत थोड़े पाणी एक वाटीत थोड़े पाणी घेउन त्यात टाकून बघावा. तो पसरला नाही पाहिजे. तो थेम्ब पाण्यातून काढून पुन्हा गोळी करून टाकला तर वाटीत टणकन आवाज येतो.असा आवाज आला तर पाक झाला असे समजावे.practice ने ते जमते.
मग त्यात तिळाचे मिश्रण घालावे.ढवळून गैस बंद करावा.
२ मिनिटानी मिश्रण एक परातीत किंवा ताटात काढून घ्यावे.हाताला तूप लावावे आणि थोड़े थोड़े मिश्रण हातावर घेउन लाडू वळावेत.
Wednesday, January 27, 2010
खजूर आणि अक्रोड्चा केक
खजूर अक्रोड़ केक
हा cake करायला खूप सोपा आहे आणि लागतोही छान. या केकचे सर्व batter मिक्सर मधे करायचे आणि मग greased भांड्यात ओतायाचे.
साहित्य
साखर-१ कप
refined oil- १ cup
vanilla essence -१ टी स्पून
सोडा बाय कार्ब -१ टी स्पून
कोमट दूध- १ कप
walnuts-१/२ कप
dates-१/२ कप
मैदा-दीड कप
कृती
प्रथम एक वाटीत कोमट दुधात खजूरचे तुकडे ५ मिनिटे भिजत घालावेत.मिक्सर मधे साखर घालून फिरवावी.त्यात refined oil घालून पुन्हा फिरवावे. दूध खजूरच्या मिश्रणात खायचा सोडा घालावा आणि ते मिक्सर मधे ओतावे.पुन्हा blend करावे. vanilla essence घालावा.नंतर थोडा थोडा मैदा मिक्सर मधे घालून blend करावे.शेवटी walnuts चे तुकडे घालावे. मग blend करू नये.greased भांड्यात मिश्रण ओतावे.(dropping consistency असावी )
गैस वर आधी पंधरा मिनिटे medium flame वर आणि नंतर ३० मिनिटे slow flame वर bake करावा।
eggless date and walnut cake in english
Tuesday, January 26, 2010
sizzling brownie

chocolate brownie केल्यावर त्याचे rectangular pieces करायचे. काजुच्या तुकडयाना थोडा तुपाचा हात लावून microwave करायचे ( साधारण ५-६ तुकडे असतील तर ३०-४० सेकंद high वर)
sizzling tray गैस var चांगला तापवायचा.तो wooden base वर ठेवायचा .त्याच्यावर brownie चा slice ठेवून वर vanilla ice cream चा scoop घालायचा.त्यावर अर्धी वाटी chocolate sauce ओतायाचा.वरून roasted cashew nuts घालायचे. sizzling hot brownie is ready
चोकोलेट लावा केक

हे chocolate brownie चे variation आहे. brownie चे mixture तयार करायचे. जर छोट्या प्रमाणावर करायचे झाल्यास chocolate brownie चे मिश्रण करायचे.(फ़क्त प्रमाण घेताना कप च्या ऐवजी स्पून असे करणे). एक छोट्या bowl मध्ये थोड़े मिश्रण घालून १ चमचा chocolate sauce घालायचे.वरून पुन्हा brownie चे मिश्रण घालायचे.साधारण २०-२२ सेकंद पर्यंत microwave केले की chocolate lava केक is ready to eat!!!!
Tuesday, January 19, 2010
उकडीचे मोदक

उकडीचे मोदक गणपतीबाप्पाचा आवडता नैवेद्य.एकदा उकड नीट जमली की मोदक जमलाच म्हणून समजा.उकड करण्याची एक पद्धत आहे.ती नीट कळली की सोपे जाईल.
साहित्य
तान्दळाचे पीठ-१ वाटी
पाणी-३/४ -१ वाटी
चिमुटभर मीठ
१ चमचा तेल
सारणासाठी
खोवलेले ओले खोबरे-१ वाटी
किसलेला गूळ-१/२ वाटी
वेलची पूड -१/२ चमचा
भाजलेली खसखस-१/२ चमचा
सर्व एकत्र करुन मंद गैस वर गुळ व खोबरे नीट मिक्स होईपर्यंत ठेवावे.
कृति
एका भांड्यात पाणी,तेल,मीठ एकत्र उकळत ठेवावे.उकळी आली की भांडे खली उतरवून त्यात पीठ घालावे.चमच्याने नीट ढवळावे.चांगले मिक्स झाले की पुन्हा मंद गैस करुन वरती ठेवावे.वर झाकण ठेवून एक वाफ काढावी.गैस बंद करावा.२ मिनिटानी एका पसरट ताटात किंवा परातीत ते पीठ घेवुन तेल व पाण्याचा हात लावून चांगले मळून घ्यावे. छोट्या गोळ्या करुन त्याची खोलागट वाटी करावी.त्यात सारण भरावे.कडेने पिठाच्यावाटीला छोटे छोटे चिमटे घ्यावेत आणि मोदकाच्या पाकळया कराव्यात.वाटीचे तोंड हळू दाबून बंद करावे.
सर्व मोदक तयार झाले की ते कुकर मध्ये whistle न लावता १०-१२ मिनिटे वाफवून काढावेत।
मोदक करताना गोळा थोडा मोठा घेउन एकावर एक असे दोन मोदकही करतात यातील खालचा मोदक छोटा आणि वरचा थोडा लहान असतो.याला कळसाचे मोदक असे म्हणतात.
Sunday, January 17, 2010
गोड शिरा
साहित्य
रवा-१ वाटी
दूध- अर्धी वाटी
पाणी- २ वाट्या
साखर- अर्धी ते पाउण वाटी
केळे-१ मध्यम आकाराचे पातळ चकत्या करुन
चिमूटभर मीठ.
तूप- ४ चमचे
बदाम, बेदाणे आवडीनुसार
कृति
प्रथम भांड्यात तुप थोड़े गरम झाल्यावर त्यात रवा घालावा आणि चांगला भाजून घ्यावा. मग त्यात केळयाच्या चकत्या घालाव्या। आणि त्या रव्यामध्ये पूर्ण एकजीव कराव्या । दूध आणि पाणी चागले गरम करावे आणि त्यात घालावे। झाकण ठेवून एक वाफ काढावी। बदामाचे कप आणि बेदाणे घालावे। साखर आणि चिमुटभर मीठ घालून मिक्स करावे.
केळयाऐवजी अननस घालूनही असाच शिरा करतात । तुपाचे आणि साखरेचे प्रमाण आवडीनुसार थोड़े वाढवले तरी चालते। केळे आणि अननसाच्या गोडीवर ते ठरवावे.
नारळाच्या रसातील शेवया

नारळाच्या रसातिल शेवया खायला अतिशय मस्त लागतात। ज्याना नारळाचे दूध किंवा रस चालत नसेल त्यानी त्या साध्या दुधात गुळ घालून खाल्ल्या तरी चालेल. त्या दुधात वेलची किंवा जायफळाची पूड घातली तर चांगली चव येइल.
साहित्य
त्तांदळाचे पीठ -१ वाटी
पाणी- पाउण वाटी
तेल-१ चमचा
मीठ चवीनुसार
नारळ -१
कृति
प्रथम एक भांड्यात ३/४ वाटी पाणी उकळावे। उकळवताना त्यात चमचाभर तेल आणि चिमुटभर मीठ घालावे.
गैस मंद करूँ त्यात त्तांदळाचे पीठ घालावे। ढवळून झाकण ठेवावे आणि गैस बंद करावा.(मोदकाप्रमाणे उकड काढावी) .५ मिनिटांनी पीठ परातीत काढून मळून घ्यावे। त्याचे मुठीने मुटके करावेत। एक भांड्यात ३-४ कप पाणी उकळावे आणि त्यात हे मुटके सोडावेत। सोडल्यावर ते तळाला जातील पण शिजल्यावर हलके होऊन वरती येतील मग गैस बंद करावा.
चकलीच्या साच्यामधे शेवेची जाळी घालून शेवया पाडाव्यात।
१ नारळ खोवून खोबर्याचा रस काढावा त्यात चवीप्रमाणे गूळ घालावा। हवे असल्यास वेलची पूड किंवा जायफळाची पूड घालावी.नीट विरघळला पाहिजे. त्यात या शेवया सोडाव्या आणि खाव्या.
Wednesday, January 13, 2010
strawberry cheese cake
बेस साठी
मारी बिस्किट्चा छोटा पुडा ( कोणतेही unsalted बिस्किट चालेल )- मिक्स़र मधून काढ्णे
salted बटर ५०-६० ग्राम ( डीप फ्रीज़ मधे ठेवलेले )
कस्टर्ड साठी
cornflour दीड चमचा
साखर अर्धा कप
दूध १ कप
topping सॉस साठी
पाणी १ कप
कॉर्नफ्लोर दीड चमचा
साखर ३ चमचे
pink कलर २-३ थेम्ब
स्ट्राबेरी essence अर्धा चमचा
हे सर्व जिन्नस एक पँन मधे एकत्र करून गैस वर गरम करावे transparent होईपर्यंत ढवळत रहावे । रूम temperature ला थंड करावे
कस्टर्ड मधे मिक्स करण्यासाठी
चीज़ spread ३ चमचे
दही ३ चमचे
whipped क्रीम १ कप
जिलेटिन २चमचे ( पाव वाटी कोमट पाण्यात भिजवणे)
स्ट्राबेरी crush अर्धी वाटी
स्ट्राबेरी colour अर्धा चमचा
कृति
बेस साठी बिस्किटे आणि लोणी एकत्र करायचे आणि एक काचेच्या भांडयाच्या तळाला आणि कडेने एकसारखे प्रेस करायचे भांडे डीप फ्रिज करायचे
कॉर्नफ्लोर साखर आणि दूध नीट मिक्स करायचे । सर्व विरघळल्यावर गैस वरती गरम करायचे सतत ढवळत रहायचे आणि जाड झाल्यावर गैस बंद करायचा रूम टेम्प रेचर ला आल्यावर फ्रिज मधे ठेवायचे। थंड झाल्यावर त्यात चीज स्प्रेड, दही, जिलेटिन, strawbery क्रश, strawbery एसेंस आणि फेटलेले क्रीम एकेक करूँ घालून बीटरने बीट करणे ।
हे मिश्रण बिस्किट सेट केलेल्या भांड्यात ओतणे ।
त्यावर वर तयार केलेला topping साँस पसरवणे
वरून फ्रेश स्ट्राबेरी ने सजवणे
chocolate brownie

chocolate brownie in english
हा chocolate brownie eggless आहे.
साहित्य
मैदा दीड कप
साखर १ कप
दूध १ कप
refined तेल १/२ कप
कोको १/२ कप
baking soda-१ टी स्पून
coffee १ टी स्पून
walnuts १/२ कप
vinegar २ टे स्पू
vanilla essence १ टी स्पू
कृती
दूध अणि व्हीनेगर एका भांड्यात मिक्स करा। मैदा, पीठी साखर, कोको, coffee अणि सोडा नीट मिक्स करा। या भांड्यात मधे एक खड्डा करुन त्यात तेल घाला। दूध विनेगर मिश्रण चमचा चमचा घालून सतत हलवत रहा अणि गुठ्ळया होऊ देऊ नका। त्यात अक्रोड चे तुकडे घाला अणि vanilla इसेंस घाला २१० degrees celcius ला ४० minutes बेक करा.
टिप
हा brownie वापरून आपल्याला sizzling brownie करता येते.
याच chocolate ब्रोव्निए चे साहित्य वापरायचे, फ़क्त walnuts घालायचे नाहीत आणि छोट्या bowl मधे हे मिश्रण घालून each bowl २०-२२ sec high वर microwave केले तर choco lava केक तयार होतो,
कैरमल कस्टर्ड
अर्धा लीटर दूध
३ टी स्पून vanilla custard powder
११ टी स्पून साखर
बारीक़ कापलेले चायना ग्रास ३ टेबल स्पून ३/४ कप पाण्यात भिजवायचे
४ टेबल स्पून साखर आणि १ टीस्पून पाणी कैरमल करता
कृति:
थोड्या दूधात कस्टर्ड पावडर लावून ते उरलेल्या दूधात मिक्स करायचे आणि त्यात साखर घालून शिजवायाचे साधारण १ मिनिट सारखे हलवायचे आणि जाड झाल्यावर गॅस बंद करायचा
भिज्ञवलेले चायना ग्रास गरम करायचे आणि कस्टर्ड लावलेल्या दूधात घालायचे आणिगाळून घ्यायचे त्यात essence घालायचा
साखर आणि पाणी एक भांड्यात घेऊन गरम करून कैरमल तयार करायचे आणि एक काचेच्या भांड्यात घालून सर्व बाजूने लागेल असे पसरवायचे ( भांडे हलवून ) त्यात कस्टर्ड चे मिश्रण घालून फ्रिज मधे २ तास सेट करण्यासाठी ठेवायचे

