खजूर अक्रोड़ केक
हा cake करायला खूप सोपा आहे आणि लागतोही छान. या केकचे सर्व batter मिक्सर मधे करायचे आणि मग greased भांड्यात ओतायाचे.
साहित्य
साखर-१ कप
refined oil- १ cup
vanilla essence -१ टी स्पून
सोडा बाय कार्ब -१ टी स्पून
कोमट दूध- १ कप
walnuts-१/२ कप
dates-१/२ कप
मैदा-दीड कप
कृती
प्रथम एक वाटीत कोमट दुधात खजूरचे तुकडे ५ मिनिटे भिजत घालावेत.मिक्सर मधे साखर घालून फिरवावी.त्यात refined oil घालून पुन्हा फिरवावे. दूध खजूरच्या मिश्रणात खायचा सोडा घालावा आणि ते मिक्सर मधे ओतावे.पुन्हा blend करावे. vanilla essence घालावा.नंतर थोडा थोडा मैदा मिक्सर मधे घालून blend करावे.शेवटी walnuts चे तुकडे घालावे. मग blend करू नये.greased भांड्यात मिश्रण ओतावे.(dropping consistency असावी )
गैस वर आधी पंधरा मिनिटे medium flame वर आणि नंतर ३० मिनिटे slow flame वर bake करावा।
eggless date and walnut cake in english
No comments:
Post a Comment