Tuesday, January 19, 2010

उकडीचे मोदक



उकडीचे मोदक गणपतीबाप्पाचा आवडता नैवेद्य.एकदा उकड नीट जमली की मोदक जमलाच म्हणून समजा.उकड करण्याची एक पद्धत आहे.ती नीट कळली की सोपे जाईल.

साहित्य
तान्दळाचे पीठ-१ वाटी
पाणी-३/४ -१ वाटी
चिमुटभर मीठ
१ चमचा तेल

सारणासाठी
खोवलेले ओले खोबरे-१ वाटी
किसलेला गूळ-१/२ वाटी
वेलची पूड -१/२ चमचा
भाजलेली खसखस-१/२ चमचा
सर्व एकत्र करुन मंद गैस वर गुळ व खोबरे नीट मिक्स होईपर्यंत ठेवावे.



कृति
एका भांड्यात पाणी,तेल,मीठ एकत्र उकळत ठेवावे.उकळी आली की भांडे खली उतरवून त्यात पीठ घालावे.चमच्याने नीट ढवळावे.चांगले मिक्स झाले की पुन्हा मंद गैस करुन वरती ठेवावे.वर झाकण ठेवून एक वाफ काढावी.गैस बंद करावा.२ मिनिटानी एका पसरट ताटात किंवा परातीत ते पीठ घेवुन तेल व पाण्याचा हात लावून चांगले मळून घ्यावे. छोट्या गोळ्या करुन त्याची खोलागट वाटी करावी.त्यात सारण भरावे.कडेने पिठाच्यावाटीला छोटे छोटे चिमटे घ्यावेत आणि मोदकाच्या पाकळया कराव्यात.वाटीचे तोंड हळू दाबून बंद करावे.
सर्व मोदक तयार झाले की ते कुकर मध्ये whistle न लावता १०-१२ मिनिटे वाफवून काढावेत।

मोदक करताना गोळा थोडा मोठा घेउन एकावर एक असे दोन मोदकही करतात यातील खालचा मोदक छोटा आणि वरचा थोडा लहान असतो.याला कळसाचे मोदक असे म्हणतात.

No comments:

Post a Comment